नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून करंजाच्या शेतकर्‍याने केली आत्महत्या


Tired of barrenness and indebtedness, a farmer of Karanja committed suicide जळगाव  : सततची नापिकी व वाढणारा कर्जाचा डोंगर यामुळे हताश झालेल्या करंजा येथील तरूण शेतकर्‍याने घरात गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवार, 18 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शरद जगन्नाथ पाटील (39, करंजा, ता.जि.जळगाव) असे मृत तरूण शेतकर्‍याचे नाव आहे.

कर्जाचा डोंगर वाढल्याने उचलले पाऊल
शरद पाटील हे शेतकरी पत्नी व दोन मुलांसह जळगाव तालुक्यातील करंजा येथे वास्तव्याला होते शेती करून आपला उदरनिर्वाह करत होते. शेतात मका आणि केळीची लागवड केल्याने त्यासाठी त्यांनी सोसायटी आणि पीक कर्ज उचलले होते. मात्र सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणा वाढत चालल्याने बुधवार, 18 जानेवारी रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली.



पहाटे उघडकीस आला प्रकार
पत्नी अनिता ह्या सकाळी उठल्यावर हा प्रकार दिसून आल्याने त्याना धक्का बसला. शेजारी राहणार्‍या ग्रामस्थांच्या मदतीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांना दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली. त्यांच्या पश्चात पत्नी अनिता, लोकश आणि सुमित हे दोन मुले, लहान भाऊ प्रदीप असा परीवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !