फेसबूकवरून झाली ओळख नंतर लग्नाचे आमिषातून अत्याचाराने विवाहिता गरोदर : भडगावातील आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा


A married woman became pregnant through the lure of marriage after meeting on Facebook : Rape case against the accused in Bhadgaon भडगाव : फेसबूकवरून गुजरात राज्यातील विवाहितेशी झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर संशयीताने लग्नाच्या आमिषाने विवाहितेला भडगावात बोलावून शहरासह नाशिकमध्ये तिच्यावर सातत्याने अत्याचार केले व यातून ती गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने पळ काढल्याची घटना शहरात घडली. या प्रकरणी शहरातील सागर भीमा वैद्य (भडगाव) याच्याविरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली.

अत्याचारातून पीडीता गर्भवती
गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातील 26 वर्षीय विवाहितेची आरोपी सागर वैद्यशी फेसबुकच्या माध्यमातून ओळख वाढली व नंतर दोघांमध्ये वाढलेल्या जवळीकनंतर आरोपीने महिलेला भडगावात 2022 मध्ये लग्न करण्याच्या आमिषाने बोलावले व त्यानंतर तिच्यावर भडगावसह नाशिकमध्ये वारंवार अत्याचार करण्यात आल्याने पीडीता त्यातून गर्भवती राहिली मात्र आरोपीने लग्न न करता फसवणूक केली शिवाय अत्याचाराचे फोटो मोबाईलमध्ये काढून ते मित्रांनाही पाठवत पळ काढला. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पीडीतेने भडगाव पोलिसात शनिवारी तक्रार दिल्यानंतर आरोपीविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक अशोक उतेकर करीत आहेत.


कॉपी करू नका.