काकोडा येथील विवाहित महिलेचा विनयभंग
molestation of a married woman in Kakoda मुक्ताईनगर : तालुक्यातील काकोडा गावातील 27 वर्षीय मजूर महिलेचा विनयभंग करण्यात आल्याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतात केला विनयभंग
काकोडा येथील 27 वर्षीय पिडीतेच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी पुंडलिक हरीदास भोजणे (काकोडा) यांनी रविवार, 29 रोजी दुपारी 1.17 वाजता प्रमोद भोजणे यांच्या शेतात विवाहितेला तु मला आवडते, मी माझ्या पत्नीला फारकत देणार आहे, असे सांगून संबंध ठेवू दे म्हणत विनयभंग केला. या प्रकारानंतर पीडीतेने पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास नाईक हरीष गवळी करीत आहेत.








