सातोदला वीज कर्मचार्‍यांना पिता-पूत्रांची मारहाण : दोघांना अटक


Father-son assault on Satodala electricity workers : Both arrested यावल : थकीत वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचार्‍यांना पिता-पुत्राने शिविगाळ करीत मारहाण केली होती. या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

दोघा संशयीतांना केली अटक
यावल तालुक्यातील सातोद येथील सुनील भास्कर धांडे यांच्याकडे मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वीज बिलाची थकबाकी मागण्यासाठी वरीष्ठ तंत्रज्ञ योगेश प्रल्हाद बारी (यावल) व सोबतचे कर्मचारी गिरीश सतीश चौधरी आल्यानंतर त्याचा राग येऊन सुनील धांडे व योगेश सुनील धांडे या दोघांनी दोन्ही कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. या प्रकरणी योगेश बारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !