अपघात टाळण्याच्या प्रयत्नात भरधाव ट्रक उलटला : चालकासह क्लिनर, जखमी


यावल : यावल-फैजपूर रस्त्याजवळ चितोडा गावाजवळ अचानक एक वाहन समोर आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक उलटल्याने चालकासह क्लिनर यांना किरकोळ दुखापत झाली तर ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले.या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.

भरधाव ट्रक उलटला
अडावद, ता.चोपडा येथून कांदा भरून ट्रक (क्रमांक एम.एच.19 सी. वाय. 7899) घेऊन चालक मुरलीधर नरवाडे (भारंबे वाडा, फैजपूर) हे क्लीनर गणेश सोनवणे (दक्षिण बाहेर पेठ, फैजपूर) यांच्यासह निघाले असताना अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर यावल-फैजपूरच्या दरम्यान चितोडा गावा जवळ त्यांच्या ट्रकच्या समोर अचानक एक वाहन आले. या वाहनाला वाचवतांना ट्रक मात्र रस्त्याच्या कडेला कलंडला. या अपघातामध्ये ट्रक चालक मुरलीधर नरवाडे व क्लिनर गणेश सोनवणे यांना किरकोळ दुखापत झाली तर ट्रकचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण कांद्याच्या गोण्या फेकल्या गेल्या. या अपघात प्रकरणी चालक मुरलीधर नरवाडे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून यावल पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार बालक बार्‍हे करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !