सिहोरला रुद्राक्ष महोत्सवात गेलेल्या नणंद-भावजयीचा अपघातात मृत्यू
देवासजवळ अज्ञात वाहनाने उडवल्याने दुर्घटना : शिंदखेड्यात शोककळा
Nanand and brother-in-law who went to Sihore for the Rudraksh festival died in an accident शिंदखेडा : मध्यप्रदेशातील सिहोर येथे रुद्राक्ष महोत्सवात गेलेल्या शिंदखेड्यातील नणंद-भावजयींचा प्रवासात स्कॉर्पिओ वाहनाने उडवल्याने मृत्यू झाला. बुधवारी रात्री मध्यप्रदेशातील देवास बायपासवर घडलेल्या या घटनेने शिंदखेडा शहरात शोककळा पसरली. सुनंदाबाई रवींद्र मिस्तरी (45) व मंगलाबाई अभिमन जाधव (44) अशी मयतांची नावे आहेत.
शिंदखेड्यात पसरली शोककळा
मध्य प्रदेशातील सिहोर येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेसाठी धुळे जिल्ह्यातून असंख्य भाविक रवाना झाले आहे. शिंदखेडा शहरातील माळीवाड्यातील जनता नगर भागातील महिला पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या कथेत सहभागी होण्यासाठी जायला खाजगी वाहनाने निघाल्या तर प्रवासादरम्यान त्या जेवणासाठी देवास बायपास रोडलगतच्या उपहारगृहात थांबल्या होत्या व जेवण झाल्यानंतर रस्ता क्रॉस करत असतांना भरधाव वेगातील स्कॉर्पिओ वाहनाने जोरदार धडक दिल्याने सुनंदाबाई रवींद्र मिस्तरी (45) या जागीच ठार तर गंभीर जखमी मंगलाबाई अभिमन जाधव (44) यांचीही उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. हा अपघात गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला.
नणंद-भावजयीच्या मृत्यूने हळहळ
अपघातात सुनंदाबाई या जागीच ठार झाल्या तर तर मंगलाबाई गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ शिरपूर येथील कॉटेज रूग्णालयाात दाखल करण्यात आले मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. एकाच परीवारातील दोन महिलांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. शोकाकूल वातावरणात शिंदखेडा दोघींवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनंदाबाई मिस्तरी यांच्या पश्चात पती, सासू, दोन मुले, दोन मुली असा परीवार आहे तर मंगलाबाई यांच्या पश्चात पती, दोन मुले, मुलगी असा परीवार आहे.


