सिहोरमधील कुबेश्वर धाम गेलेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात : पातोंड्यातील दोन महिला ठार


Accident involving the vehicle of devotees going to Kubeshwar Dham in Sihore: Two women from Patonda killed अमळनेर : रुद्राक्ष महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेलेल्या अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील दोन भाविक महिलांचा चारचाकी वाहनाला झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच शिंदखेड्यातील नणंद-भावजयींचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा अपघाताचे वृत्त समोर आल्याने भाविकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाममध्ये गुरुवार. 16 फेब्रुवारीपासून सात दिवसीय रुद्राक्ष महोत्सव सुरू झाला असून महाराष्ट्रातून हजारो भाविक त्यात सहभागी झाले आहेत.

अपघातात दोन महिला ठार
सूत्रांच्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील भाविक रूद्राक्ष महोत्सवासाठी दोन दिवसांपूर्वी रवाना झाले होते मात्र परतीच्या प्रवासात भाविकांच्या वाहनाला (एम.एच.19 डी.व्ही.6783) ला मध्य प्रदेशातील जुलवानियाजवळ शुक्रवारी पहाटे पाच वाजता अपघात झाला व त्यात दोन महिला ठार झाल्या. शोभाबाई लुकडू पाटील (52) व कमलबाई आत्माराम पाटील (55) अशी मयत महिलांची नावे आहेत. या अपघातात वाहनातील अन्य भाविक जखमी झाले असून त्यांना जुलवानिया येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !