भरधाव चारचाकीच्या धडकेने निमखेडी विद्यार्थी ठार : दुसरा जखमी
मुक्ताईनगर : भरधाव मॅजिक वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर सहकारी मित्र गंभीर जखमी झाला. हा अपघात इच्छापूर गावाजवळ सोमवारी दुपारी 12.30 वाजता घडला.
मॅक्झीमो गाडीवरील चालकाविरोधात गुन्हा
निखील गजानन सोनवणे (19, निमखेडी, ता.मुक्ताईनगर) असे ठार झालेल्या तरुणाचे नाव असून गौरव श्रीकृष्ण सपकाळे (वय 18) असे गंभीर जखमीचे नाव आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर भगवान सोनवणे (34, रा.निमखेडी, ता.मुक्ताईनगर) यांच्या फिर्यादीवरून मॅक्झीमो गाडीवरील चालक ज्ञानेश्वर त्र्यंबक कोळी (28, कोर्हाळा) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कोळी यांनी त्यांच्या ताब्यातील चारचाकी (क्रमांक एम.एच. 48 ए.9031) भरधाव व अविचाराने चालवत दुचाकीला धडक दिल्याने फिर्यादीचा पुतण्या निखील गजानन सोनवणे (19) हा जागीच ठार झाला तर गौरव श्रीकृष्ण सपकाळे (18) हा गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी दुपारी 12 वाजता इच्छापूर गावाजवळ जांभूळ नाल्याजवळ घडला तपास हवालदार विनोद श्रीनाथ करीत आहेत. दरम्यान, मृत निखील हा तरुण नांदुरा येथे वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्गात शिक्षण घेत होता व तो मित्र गौरवसोबत सकाळी निमखेडी येथून मलकापूर येथे जाण्यासाठी निघाले असतनाच हा अपघात घडला.








