सावदा बसस्थानकावर तरुणीच्या हातातून पर्स लांबवली : आरोपीला अटक
Purse snatched from girl’s hand at Savada bus stand: Accused arrested सावदा : बसमधील गर्दीचा फायदा घेत तरुणीच्या हातातील तीन हजारांचा ऐवज असलेली पर्स भामट्याने लांबवली. या प्रकरणी सावदा पोलिसात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली.
आरोपीला अखेर पोलिसांकडून अटक
पांडुरंग नारायण पाटील (48, कोचूर) यांच्या तक्रारीनुसार, सोमवार, 13 रोजी सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास त्यांची मुलगी नम्रता पांडुरंग पाटील ही रावेर-कल्याण बसमध्ये चढत असताना संशयित निंबाजी गोकुळ पाटील (24, पातोंडी, ता.जळगाव) याने तरुणीच्या हातातील पर्स हिसकावली व त्यास विरोध केल्याने आरोपीने तरुणीला मारहाण करीत पळ काढला. या पर्समध्ये तीन हजारांची रोकड, पॅनकार्ड, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, एटीएम असा ऐवज होता. सोमवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. तपास उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.








