भानखेडा येथे घराला आग : 70 हजारांचे नुकसान
House fire at Bhankheda : loss of 70 thousand बोदवड : कुडाच्या घराला मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या संसारोपयोगी वस्तू जळाल्याने सुमारे 70 हजारांचे नुकसान झाल्याची घटना बोदवड तालुक्यातील भानखेडा येथे घडली.
मध्यरात्रीच्या सुमारास लागली आग
बोदवड तालुक्यातील भानखेडा येथील राजू किसन मोरे व शोभा राजू मोरे वास्तव्यास असून त्यांच्या कुडासह मातीच्या घराला शनिवारी रात्री उशिरा अचानक आग लागी. या आगीत घरातील दोन पोते गहू, 50 कोंबड्या, कपडे लत्ते घरातील भांडे जळाल्याने सुमारे 70 हजार रुपयांचे नुकसान झाले. तलाठी हेमंत महाजन यांनी नुकसानीचा पंचनामा केला. सुदैवाने जीवितहानी टळीली. पंचनाम्याप्रसंगी सरपंच अनिल मोरे, पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती हजर होते.

