भुसावळात रेल्वे कर्मचार्‍याच्या घराला आग : सव्वातीन लाखांचे नुकसान


Fire at railway employee’s house in Bhusawal : loss of Rs.3.25 ;akh भुसावळ : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोडवरील रेल्वेच्या पीओएच कॉलनीतील रहिवासी तथा रेल्वे कर्मचारी अमरेंद्र कुमार शंभूप्रसाद पटेल (39, कंडारी) यांच्या आरबी सेकंड 1214/बी या घराला शॉर्ट सर्कीटमुळे गुरूवारी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास आग लागली होती.

जुनाट वायरींगमुळे लागली आग
जुनाट वायरींगमुळे लागलेल्या या आगीत तीन लाख 18 हजार शंभर रुपयांचे नुकसान झाले असून तशी नोंद शहर पोलिसात करण्यात आली आहे. कंडारी येथील पीओएच कॉलनीतील रहिवासी रेल्वे कर्मचारी अमरेंद्र कुमार शंभूप्रसाद पटेल (39) यांच्या रेल्वे क्वॉर्टरमध्ये गुरूवारी संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घरातील इलेक्ट्रीक वायरींग जळाल्यानंतर आग लागून त्यात घरातील संसारोपयोगी साहित्यासह अन्य सामान जळाल्याने मोठे नुकसान झाले होते. शनिवारी आगीबाबत शहर पोलिसात नोंद करण्यात आली. तपास हवालदार संजय सोनवणे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !