कथित भ्रष्टाचार प्रकरण : दिल्लीतील उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीयांची कोठडीत रवानगी
Chutney bread agitation by Vanchit Bahujan Contractors Association in Deepnagar दिल्ली : उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आल्यानंतर दिल्ली न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. आता रद्द करण्यात आलेले अबकारी धोरण 2021-22 च्या निर्मिती आणि अंमलबजावणीमध्ये कथित भ्रष्टाचार केल्याप्रकरणी न्यायालयाने रविवारी सिसोदिया यांना अटक केली. सिसोदिया यांना सोमवारी राऊस अॅव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले.
चौकशी समिती स्थापन
सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या वकिलांच्या युक्तिवादाला विरोध केला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला दिला की सीबीआय कोणत्याही परीस्थितीत तपास करू शकते. मनीष सिसोदिया यांचे वकील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर म्हणाले, निवडून आलेल्या सरकारला काय करायचे आहे, आज एक चौकशी स्थापन करण्यात आली आहे, ती देखील जेव्हा एलजीने घटनात्मक कार्यकर्ता म्हणून मान्यता दिली होती.




के.कविता यांच्यावर होणार कारवाई
अबकारी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक झाल्यानंतर तेलंगणा भाजपाचे नेते विवेक व्यंकटस्वामी यांनी खळबळजनक दावा केला आहे. सिसोदिया यांच्यानंतर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांची कन्या के.कविता यांना लवकरच अटक केली जाईल, असं विधान विवेक व्यंकटस्वामी यांनी केलं आहे.
आणखी काहींवर कारवाईची शक्यता
मद्य अबकारी कराच्या घोटाळ्यासंदर्भात आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. के.कविता यांनाही लवकरच अटक केली जाईळ. पंजाब आणि गुजरात निवडणुकीवेळी के.कविता यांनी आम आदमी पक्षाला 150 कोटी रुपयांची मदत केली होती, असा आरोप भाजपा नेते विवेक व्यंकटस्वामी यांनी केला आहे.