काश्मिरी पंडिताच्या हत्येनंतर दहशतवाद्याचा खात्मा


After the killing of a Kashmiri Pandit, the terrorist was killed श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित संजय शर्मा यांची गोळ्या झाडून हत्या केल्याच्या काहीच तासानंतर दहशतवादी आणि सैन्यामध्ये मोठी चकमक झाल्यानंतर पंडिताची हत्या करणार्‍या दहशतवाद्याला ठार मारण्यात यंत्रणेला यश आले आहे. या चकमकीत दोन जवान जखमी झाले असून या दहशतवाद्याने पुलवामा येथील काश्मिरी पंडितांनी हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे.

सोमवारी रात्री चकमक
सोमवारी या परिसरात एक दहशतवादी लपून बसल्याची माहिती सैन्याला मिळाली. या घटनेची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी रात्री ट्विट करुन दिली. ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव पुलवामा येथील आकिब मुस्ताक भट असे आहे. त्याने सुरुवातीला हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेसाठी काम केले, आजकाल तो टीआरएफमध्ये काम करत होता. काश्मिरी पंडित यांचा मारेकरी झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. दहशतवाद्याचा मृतदेह अद्याप मिळालेला नाही आणि सध्या पदगमपुरा भागात चकमक सुरू आहे. सोमवारी रात्री उशिरा ही चकमक झाली. पुलवामा जिल्ह्यातील पदगमपुरा अवंतीपोरा येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर सुरक्षा दलांनी घटनास्थळाला वेढा घातला.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !