अस्वलाने केलेल्या हल्ल्यात प्रौढाचा मृत्यू : चोपडा तालुक्यातील घटना


Adult Dies in Bear Attack : Incident In Chopda taluka अडावद : चोपडा तालुक्यातील शेवरा बु.॥ गावातील प्रौढाचा अस्वलाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू ओढवला आहे. या प्रकरणी अडावद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बिसना बांगड्या बारेला (वय 41, शेवरा बु.॥ ता.चोपडा) असे मयताचे नाव आहे.

जंगलात केला अस्वलाने हल्ला
बिसना बांगड्या बारेला हे गुरुवार, 2 मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास गाव लगतच्या जंगलात आपल्या जनावरांच्या शोधात गेले असता अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अस्वलाने बारेला यांच्या चेहर्‍यावर चावा घेतल्याने त्यांचे दोघे डोळे फुटले. अस्वलाच्या हल्ल्यामुळे मयताचा चेहरा अत्यंत विद्रूप झाला होता. हल्ल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी उपचाराकामी बारेला यांना उपजिल्हा रूग्णालय चोपडा येथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात डॉ.सागर पाटील यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस नाईक जयदीप राजपूत करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !