जळगावातील महिलेवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार : तरुणाविरोधात गुन्हा
Rape of a woman in Jalgaon on the lure of marriage : Crime against youth जळगाव : शहरातील एका भागातील 42 वर्षीय महिलेवर लग्नाच्या आमिषाने वारंवार बलात्कार करण्यात आला तसेच पैसेही उकळून लग्न न करता फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जळगावच्या एमआयडीसी पोलिसात श्रीकृष्ण तुकाराम मेंगडे (रा.अयोध्या नगर) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाविरोधात गुन्हा दाखल
रामानंद नगर पोलिसात 42 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित श्रीकृष्ण तुकाराम मेंगडे (रा.अयोध्या नगर) याने 23 मार्च 2017 ते 30 मे 2019 च्या काळात पीडीतेसोबत जबरजस्तीने शारीरीक संबंध प्रस्तापित करीत लग्नाचे आमिष दाखवून फसवणूककेली तसेच पीडीतेकडून वेळोवेळी काही ना काही कारणाने पैसे मागून तिची फसवणूक केली. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.

