नागालँडमध्ये भाजपाला राष्ट्रवादीचा पाठींबा : गुलाबराव पाटील म्हणाले ; 50 खोके एकदम ओक्के !
NCP supports BJP in Nagaland : Gulabrao Patil said ; 50 boxes are ok ! मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या गटातून बाहेर पडलेल्या शिंदे गटातील आमदारांवर नेहमीच पन्नास खोके एकदम ओकेची टिका होताना दिसते मात्र आता नागालँडमध्ये झालेल्या या निवडणुकीत भाजपाला राष्ट्रवादीने दिलेल्या पाठिंब्यानंतर शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. एकीकडे आम्हाला जातीवादी सरकार म्हणून आरोप करायचे आणि तिकडे मांडीला मांडी लावून बसायचं, त्यामुळेच आमचा सवाल आहे, 50 खोक्के आणि नागालँड ओक्के, असं झालंय का? असे गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil) यांनी म्हणताच खळबळ उडाली.
एजन्सी सर्व तुमच्याच मग चौकशी करायला रोखलय कुणी : अजित पवार
राज्य सरकार आणि केंद्र सरकार तुमच्या हातात आहे, मग तुम्ही चौकशी करा. सगळ्या एजन्सीच तुमच्या हाती आहेत, मग चौकशी करायला तुम्हाला कोणी अडवलंय. कारण नसताना असं कोणावरही कशाप्रकारे आरोप करणे योग्य नाही, असे प्रत्युत्तर अजित पवार यांनी गुलाबराव पाटील यांना दिले. त्यानंतर, पुन्हा छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीची बाजू मांडली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर देत राष्ट्रवादीसह विरोधकांना टोला लगावला.




काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे
छगन भुजबळ म्हणाले आम्ही केवळ मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला. पण, हा कसला पाठिंबा, हे सगळं सोयीचं झालं. आपलं ठेवायचं झाकून, दुसर्याचं पाहायचं वाकून, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोपरखळी लगावली. तसेच, 2014 साली महाराष्ट्रातही तुम्ही न मागता भाजपला पाठिंबा दिला होता. त्यामुळे, शिशे के घर मे रहनेवाले, दुसरों के घर पत्थर नही फेका करते, अशी डायलॉगबाजीही मुख्यमंत्री शिंदेंनी केली.
नागालँडमध्ये भाजपला आमचा पाठिंबा नाही
NCP supports BJP in Nagaland : Gulabrao Patil said ; 50 boxes are ok!आमचा पाठिंबा भाजपला नसून नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना आहे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, नागालँड राज्याच्या व्यापक हिताचा विचार करता त्याचसोबत राष्ट्रवादी आणि रिओ यांचे जुने संबंध पाहता या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीने सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नागालँडमध्ये सर्वपक्षीय सरकार स्थापन झाले असून एकही पक्ष विरोधात बसायला तयार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी सांगितले.