प्रेयसीला चोरून भेटायला गेला अन नातेवाईकांच्या तावडीत सापडला : मारहाणीत तरुणाचा मृत्यू


नवी दिल्ली : प्रेयसीच्या घरी गुपचूप भेटण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण करण्यात आल्याने त्याचा मृत्यू ओढवला. ही घटना केरळमधील असून प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बस चालक तरुणाचा मारहाणीत मृत्यू
ही घटना केरळमधील त्रिशूर परीसरातील असून 33 वर्षीय तरुण खाजगी बसवर चालक होता. या प्रकरणी आतापर्यंत आठ आरोपींची ओळख पटल्याचे माहिती पोलिसांनी दिली. सहार असे मृताचे नाव आहे. सीसीटीव्ही फुटेजनुसार, सहार गर्लफ्रेंडच्या घरातून बाहेर पडताना दिसला आणि काही लोकांनी त्याची चौकशी केली. यानंतर त्यांनी सहारला मारहाण करायला सुरुवात केली, त्यानंतर सहार घरी गेला. दुसर्‍या दिवशी सकाळी त्याला त्रास जाणवू लागल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठवडाभरातच सहारची प्रकृती खालावली होती, असे अहवालात म्हटले आहे. त्याच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.


कॉपी करू नका.