डांभूर्णी येथील 22 वर्षीय तरुणीचा एकतर्फी प्रेमातून विनयभंग
A 22-year-old girl from Dambhurni was molested out of one-sided love यावल : तालुक्यातील डांभूर्णी या गावातील 22 वर्षीय तरुणीचा गावातीलच तरुणाने सतत पाठलाग करून मी तुझ्यावर प्रेम करतो तू माझ्याशी संबंध ठेव, असे सांगत विनयभंग केला. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तरुणाविरोधात गुन्हा दाखल
डांभूर्णी येथील 22 वर्षीय तरुणीने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार नितीन सुरेश कोळी (डांभूर्णी) याने तरुणीवर एकतर्फी प्रेमातून डांभुर्णी गावात आठवडे बाजारात व रस्त्याने जातांना सतत तिचा रस्ता अडवून मी तुझ्यावर प्रेम करतो, तु पण माझ्यावर प्रेम कर व माझ्यासोबत संबंध ठेव असे सांगून तिचा विनयभंग केला. पीडीत तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात संशयित नितीन कोळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अजीज शेख करीत आहे.

