सभागृहात आमदार एकनाथराव खडसे संतप्त ; म्हणाले मला लावलेला न्याय तोच भूषण देसाईंना लावणार का !


MLA Eknathrao Khadse angry in the hall ; They said that the same justice that was done to me will be done to Bhushan Desai! मुंबई : आमदार एकनाथराव खडसे आज पुन्हा एकदा आक्रमक पवित्र्यात दिसले असून त्यांनी भूखंड घोटाळ्यावरून भाजपा-शिवसेनेला घेरत आपल्याला लावलेला न्याय भूषण देसाईंना लावणार का? असा प्रश्न उपस्थित करून खळबळ उडवून दिली. ठाकरे गटाचे नेते आणि माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. यावरुन विधान परीषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते एकनाथ खडसे यांनी भूषण देसाई यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाचं कारण सांगत शिवसेना-भाजपा सरकारला घेरले. यावेळी त्यांनी स्वत:वर आरोप झालेल्या कथित भूखंड घोटाळ्याबाबतही पुन्हा एकदा भाष्य केलं.

तीन हजार कोटींचा घोटाळ्याचा भाजपा आमदारांचा आरोप
आमदार एकनाथ खडसे म्हणाले की, भूषण देसाई यांनी वडिलांची साथ का सोडली? त्याचे कारण म्हणजे भूषण देसाई यांचे चार लाख 1400 स्क्वेअर मीटर औद्योगिक भूखंडाचे अवैध वाटप केले. त्यात जवळपास तीन हजार कोटींचा घोटाळा झाला असा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी करत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली. उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली. भाजपा आमदार मागे लागले. चौकशी सुरू झाली. सुभाष देसाईंचा मुलगा आहे. विरोधी पक्षाचे ते नेते आहे म्हणून ही पाऊले उचलण्यात आली, असे खडसे म्हणाले.

तोच न्याय भूषण देसाईंना लावणार का ?
आता हे प्रकरण ईडीकडे जाणार आहे असा निरोप भूषण देसाईंकडे पाठवला पण तो आता पावन झाला आहे कारण त्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे.. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसांच्या आश्रयाखाली तो आला असून तुमच्याकडे आला तर सगळं संपलं. माझ्यावर भूखंडाचे आरोप झाले. एक रुपयाचा माझा संबंध त्याच्याशी नाही. तरी माझ्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला. मला लावलेला न्याय तोच भूषण देसाईंना लावणार का? असा संतप्त सवाल एकनाथ खडसेंनी सभागृहात सरकारला विचारला.

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !