रेल्वेतील फुकट्या प्रवाशांवर कारवाईची संक्रांत : एका दिवसात साडेसतरा लाखांचा दंड वसुल


Sankranti of action against free passengers in railways: Seventeen and a half lakhs fine in one day भुसावळ : रेल्वे प्रवासात तिकीटाविनाच प्रवास करणार्‍या प्रवाशांविरोधात रेल्वे प्रशासनाने मोहिम उघडली आहे. मंगळवारी एकाच दिवसात प्रशासनाने धडक कारवाई करीत तब्बल 17 लाख 30 हजारांचा दंड वसुल केला. या कारवाईने फुकट्या प्रवाशांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. डीआरएम एस.एस.केडीया, मुख्य विभागीय वाणिज्य व्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ विभागात वाणिज्य विभाग व आरपीएफ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने खंडवा ते इगतपुरी, अमरावती ते भुसावळ, चाळीसगाव- धुळे तसेच जलंब-खामगाव विभागात एक दिवसीय तिकीट चेकींग मोहिम राबवण्यात आली. तीन हजार 22 केसेसद्वारे एकूण 17 लाख 30 हजारांचा दंड वसुल करण्यात आला.

प्रवाशांमध्ये कारवाईने उडाली खळबळ
वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासनीस आणि आरपीएफ जवान यांच्या संयुक्त पथक तयार करून सुमारे 70 गाड्यांची तपासणी करण्यात आली. नाशिक, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, अकोला, बडनेरा या स्थानकांवरही तपासणी करण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी यांच्यासह तीन अधिकारी, तिकीट चेकिंग स्टाफ, वाणिज्य स्टाफ व आर.पी.एफ स्टाफ अशा एकूण 42 टीमने सहभाग नोंदवला. दरम्यान, रेल्वे प्रवाशांनी प्रवासादरम्या योग्य ते तिकीट घेवून प्रवास करावा तसेच युटीएस अ‍ॅप प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !