भरधाव वाहनाने उडवल्याने दहिगावच्या इसमाचा मृत्यू : पत्नी जखमी


धरणगाव : भरधाव वाहनाने उडवल्याने दुचाकीस्वार दहिगावातील प्रौढाचा मृत्यू झाला तर पत्नी जखमी झाल्याची घटना जळगाव रोडवरील हॉटेल अमोलच्या पुढे सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नामदेव किसन पाटील (56 रा.दहिगाव, ता.पारोळा) असे मयताचे नाव आहे.

भीषण अपघातात पतीचा जागीच मृत्यू
सोमवार, 13 रोजी दुपारी नामदेव किसन पाटील आणि शोभाबाई नामदेव पाटील हे दुचाकी (एम.एच.19 सी.क्यू.1577) द्वारे भोद, ता.धरणगाव येथे आले होते व परतीच्या प्रवासात धरणगाव ते पिंप्री गावाच्या दरम्यान अमोल हॉटेलच्या पुढे चालत असताना दुचाकीला कुठल्यातरी अज्ञात वाहनाने उडवल्याने नामदेव पाटील यांच्या डोक्यास गंभीर मार लागून दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर शोभाबाई या देखील जखमी झाल्यात. या प्रकरणी हितेंद्र नामदेव पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनावरील (चालक नाव-गाव माहित नाही) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एएसआय करीम सैय्यद हे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !