दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षेदरम्यान तरुणाकडून विनयभंग


Class 10 student molested by youth during exam भडगाव : तालुक्यातील एका गावात दहावीच्या विद्यार्थिनीचा परीक्षा हॉलमध्येच एकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडली आहे. याप्रकरणी भडगाव पोलिसात एका तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाठलाग करीत केला विनयभंग
पीीत अल्पवयीन विद्यार्थिनीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पीडिता इयत्ता 10 वी बोर्डाचे पेपर देण्यासाठी जात असतांना संशयित आरोपी तरुण हा 1 मार्चपासून सतत पाठलाग करत होता तर बुधवार, 15 मार्च रोजी त्याने पीडीतेला मी तुझ्यावर प्रेम करतो. तू का करत नाही, असे म्हणत, तू मला ध्यानात ठेव, मी तुला बघून घेईल, अशी धमकी देवून वर्गातून निघून गेला. एव्हढेच नव्हे तर संशयित आरोपीने हात धरुन प्रेम करण्यासाठी बळजबरी करुन पिडीतेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहा.निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !