जामनेरात भावबंदकी उफाळली : पत्नीस आणण्यास नकार देणार्‍या भावावर हल्ला


जामनेर : माहेरी गेलेल्या पत्नीला आणण्यास नकार दिल्याच्या रागातून भावाने भावावरच लोखंडी टिकम मारून हल्ला केला तर वहिनीला अश्लील शिविगाळ केल्याची घटना शहरात घडली. या प्रकरणी बुधवारी रात्री उशीरा जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भावाविरोधात जामनेरात गुन्हा
नरेंद्र बद्रीनरायण बुळे (50, नगरखाना, जामनेर) यांच्या तक्रारीनुसार शेजारी त्यांचा भाऊ गोपाल बद्रीनारायण बुळे राहतो. गेल्या काही दिवसांपासून गोपाल बुळे याची पत्नी माहेरी गेल्याने पत्नीला माहेरहून घेवून येण्यास गोपालने भाऊ नरेंद्र बुळे यांना सांगितल्याने नरेंद्र यांनी नकार दिला व त्याचा राग येवून गोपालने टिकावच्या दांड्याने नरेंद्रला मारहाण करून हाताला दुखापत केली तर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नी कावेरी बुळे यांना शिवीगाळ करून तुमचा मर्डर करून टाकीन अशी धमकी दिली. ही घटना बुधवारी 12.35 वाजेच्या सुमारास घडली. नरेंद्र बुळे यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने संशयित आरोपी गोपाल बद्रिनारायण बुळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार जयेंद्र पगारे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !