अमळनेरात धाडसी घरफोडी : 53 हजारांचा ऐवज लांबवला
अमळनेर : शहरात चोर्या-घरफोड्या वाढल्या असतानाच गणेश कॉलनीत धाडसी घरफोडी झाल्याची बाब उघकीस आली आहे. चोरट्यांनी बंद घरातून सोन्याचे दागिने मोबाईल व रोकड असा एकूण 53 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. याबाबत बुधवारी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अमळनेर पोलिसात गुन्हा
शीतल दीपक पवार (41, गणेश कॉलनी, अमळनेर) यांच्या तक्रारीनुसार, मंगळवार, 14 मार्च रोजी रात्री 11 ते 15 मार्च रोजी पहाटे 3 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे दरवाजाचे कडी आतून उघडून घरात प्रवेश केला करीत कपाटातील 20 हजारांची रोकड, सोन्याचे दागिने आणि मोबाईल असा एकूण 53 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी पवार यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.