थोरगव्हाणच्या 29 वर्षीय तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न


A 29-year-old youth from Thorgavan attempted suicide यावल : तालुक्यातील थोरगव्हाण येथील एका 29 वर्षीय तरूणाने विषारी द्रव्य प्राशण करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार निर्दशनास येताचं कुटुंबीयांनी त्यास यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे प्रथमोपचार करतांना त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास जळगाव हलवण्यात आले.

विषारी द्रव सेवन करीत आत्महत्येचा प्रयत्न
थोरगव्हाण येथील स्वप्निल देविदास चौधरी (29) या तरूणाने काहीतरी विषारी पदार्थ सेवन केल्यानंतर त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकिय अधिकारी डॉ.शिवदास चव्हाण, अधिपरीचारीका आरती कोल्हे, संजय जेधे आदींनी प्रथमउपचार केले. त्याची प्रकृती अधिकचं बिघडल्याने त्यात तत्काळ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या रूग्णालयात हलवण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !