भाजपा दिव्यांग आघाडीच्या शहराध्यक्षपदी अशोककुमार नागदेव


भुसावळ : दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी नेहमीच पुढाकार घेणारे भुसावळचे अशोककुमार नागदेव यांची भारतीय जनता पार्टी दिव्यांग आघाडीच्या शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीचे नियुक्तीपत्र रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांच्याहस्ते देण्यात आले. माजी पालकमंत्री आमदार संजय सावकारे, भाजपा शहराध्यक्ष परीक्षीत बर्‍हाटे, सरचिटणीस रमाशंकर दुबे, संदीप सुरवाडे, महिला मोर्चा अध्यक्षा अनिता आंबेकर, शंकर शेळके यांची उपस्थिती होती.

दिव्यांग बांधवांचे संगठण उभारणार
आगामी काळात पक्षाच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांचे संगठन उभारण्यात येणार असून त्यांच्यासाठी विविध योजना राबवून दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनविण्याच्या प्रयत्न करणार असल्याचा मानस नुतन दिव्यांग आघाडी शहराध्यक्ष अशोक कुमार नागदेव यांनी व्यक्त केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !