कुरीयर कंपनीच्या नावाने धरणगावातील प्रौढाला 83 हजारांचा गंडा


83 thousand to an adult in Dharangaon in the name of courier company धरणगाव  : शहरातील प्रौढाची कुरीयर कंपनीच्या नावाने 83 हजारात ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

फसव्या कॉलपासून सावध राहण्याचे आवाहन
नितीन श्रावण पाटील (45) यांना गुरुवार. 16 मार्च रोजी कोणीतरी अज्ञात इसमाने डीटीडीसी कंपनीच्या म्हणून कस्टमर केअर मधून बोलत असल्याचे सांगत 8653628771 या क्रमांकावर संपर्क साधला. संबधीत व्यक्तीने कुरीयरचे डिटेल्स विचारत नितीन पाटील यांच्या मोबाईलवर बेसएपीके नावाची पीडीएफ फाईलची लिंक टाकत त्या लिंकद्वारे रजीस्ट्रेशन करायला सांगितले. नितीन पाटील यांनी त्या लिंकवर जात माहिती भरल्यानंतर ऑनलाईन पाच रुपये फी या लिंकद्वारे पाठवण्यात आल्यानंतर दुसर्‍या दिवशी आपल्या बँक खात्यातून कोणीतरी अज्ञात इसमाने एकूण पाच ऑनलाईन ट्रान्झेक्शनद्वारे तब्बल 83 हजार काढून घेतल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे हे करीत आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !