अवकाळी पावसाने जिल्ह्यात साडेतेराशे हेक्टरवर नुकसान

अन्नदाता संकटात : पंचनाम्यांच्या सोपस्कारासोबत हवी आता ठोस भरपाई


Unseasonal rains caused damage to 1350 hectares in the district भुसावळ : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. राज्य कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेसाठी संपावर उतरल्याने तुरळक कर्मचार्‍यांवर गाढा सुरू असतानाच पंचनाम्यास दिरंगाई झाली आहे. कृषी विभागाने केलेल्या प्राथमिक पंचनाम्यानुसार, जिल्ह्यातील यावलसह रावेर व चाळीसगाव, पाचोरा तालुक्यातील एक हजार 343 हेक्टरवरील पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

चार तालुक्यात सर्वाधिक फटका
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील यावलसह रावेर व चाळीसगाव, पाचोरा तालुक्यातील हरभरा, बाजरी, मका, ज्वारी, केळीसह अन्य पिकांना फटका बसला आहे. यावल तालुक्यात शनिवार, 18 रोजी झालेल्या अवकाळी पावसाचा नऊ गावातील 50 शेतकर्‍यांना फटका बसून 55.02 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले तर रावेर तालुक्यातील 36 गावातील 1012 शेतकर्‍यांकडील 829.25 हेक्टरवरील पिके बाधीत झाली. चाळीसगाव तालुक्यातील 16 गावांमधील 919 शेतकर्‍यांकडील 459 हेक्टरवरील शेती पिकांचे तसेच पाचोरा तालुक्यातील तीन गावातील 10 शेतकर्‍यांचे 4.20 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकार्‍यांनी दिली.

गव्हासह मक्याला सर्वाधिक फटका
कृषी विभागाच्या माहितीनुसार, जिल्ह्यातील वरील चारही तालुक्यात गव्हासह मका पिकाला सर्वाधिक फटका बसला असून 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. चारही तालुक्यातील 64 गावातील एक हजार 991 शेतकर्‍यांच्या एक हजार 347.47 हेक्टरवरील पिकांना फटका बसल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. ही आकडेवारी प्राथमिक असल्याने त्यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. माय-बाप सरकारने पंचनाम्यांच्या सोपस्कारासोबत आता भरीव आर्थिक मदत करण्याची अन्नदात्याला अपेक्षा आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !