दिव्यांगाचे बनावट प्रमाणपत्र देणारी शहाद्यातील टोळी जाळ्यात
A gang in Shahada who issued fake disability certificates is in the net शहादा : दिव्यांग बांधवांचे बनावट प्रमाणपत्र बनवून तसेच बनावट शिक्क्यांद्वारे राज्य महामंडळाच्या कागदपत्रांवर शिक्के मारून शासनाची फसवणूक करणार्या टोळीतील तिघांच्या मुसक्या आवळल्यात पोलिस यंत्रणेला यश आले आहे. संशयीतांना न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. अटकेतील संशयीतांमध्ये संदीप उर्फ संतोष गोरख पानपाटील, महेंद्र सीताराम वाघ व सुनील चौधरी (सर्व रा.शहादा) यांचा समावेश असून महेंद्र वाघ हे संशयीत जिल्हा परीषद शाळेत शिक्षक आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शहादा शहरात अनेक दिवसांपासून दिव्यांगांना महसूल, ग्रामविकास, परीवहन महामंडळाकडून देण्यात येणार्या सवलतींच्या प्रमाणपत्रांवर अवैधरीत्या बोगस शिक्के मारुन देणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी बसस्थानक परीसरात असलेल्या एका कटलरीच्या दुकानासह कापडाच्या दुकानातून बनावट रबरी स्टॅम्प, खोट्या पासेस जप्त केल्या शिवाय अपंग, कर्णबधीर आदींचे बनावट प्रमाणपत्रदेखील आढळून आले. आतापर्यंत शेकडो जणांना या बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ दिला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्वप्नील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संदीप उर्फ संतोष गोरख पानपाटील, महेंद्र सीताराम वाघ व सुनील चौधरी (सर्व रा.शहादा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, अटकेतील महेंद्र वाघ हे आमलाड, ता.तळोदा येथील जिल्हा परीषद शाळेत उपशिक्षक आहे तसेच सुनील चौधरी याची प्रिंटींग प्रेस असल्याची माहिती आहे.