पाचोरा शहरात शॉर्ट सर्किटने कॉम्प्युटर्स दुकानाला आग : आठ लाखांचे नुकसान


Short circuit in Pachora city sets fire to computer shop : loss of eight lakhs पाचोरा : पाचोरा शहरातील साई कॉम्प्यूटर्स दुकानाला मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक आग लागल्याने सुमारे आठ लाखांचे साहित्य आगीत खाक झाले. आगीचे ठोस कारण समोर आले नसलेतरी शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.

दुपारच्या सुमारास लागली आग
पाचोरा शहरातील उमेश राऊत यांचे साई कॉम्प्युटर्स नामक दुकान जामनेर रोडवरील सुपडू भादू पाटील व्यापारी संकुलात आहे. राऊत मंगळवारी दुपारी घरी आल्यानंतर अचानक दुकानाला आग लागली व पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केल्याने दुकानातील एक-एक वस्तू आगीच्या विळख्यात जावू लागल्या. पाचोरा अग्निशमन दलाचा बंब अजिंठा येथे गेल्यानंतर भडगाव येथे बंबाला पाचारण करण्यात आले मात्र तो पर्यंत आगीने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. आगीत सुमारे आठ लाखांवर नुकसान झाल्याची माहिती आहे. आगीमुळे दुकाना संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, फर्निचर, एसी जळून खाक झाले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !