बांभोरीच्या पादचार्याचा मृत्यू : वाहनधारकाविरोधात गुन्हा
Bambhori Pedestrian’s Death : Crime Against Driver धरणगाव : बांभोरी येथील पादचार्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेने मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सुनील छगन नन्नवरे (45, रा.बांभोरी, ता.धरणगाव) असे मयत प्रौढाचे नाव आहे.
अपघातानंतर वाहनधारक पसार
धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावातील सुनील नन्नवरे हे सोमवारी सायंकाळी 7 वाजता काम संपल्यानंतर घराकडे पायी निघाले असताना जैन कंपनीसमोर एका अज्ञात वाहनाने मागून येवून जोरदार धडक दिल्याने नन्नवरे हे जागीच ठार झाले तर अज्ञात वाहनचालक हा पोलिसांना माहिती न देता पसार झाला. अपघात प्रकरणी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


