अकलूदच्या तरुणावर चाकूहल्ला करणार्‍यांवर कारवाई न झाल्यास मंगळवारी रास्ता रोको

भुसावळात कोळी महासंघाचा पत्रकार परीषदेत इशारा : फैजपूर पोलिस ठाण्याबाहेर आंदोलनाचा इशारा


If action is not taken against those who stabbed the Aklud youth, block the road on Tuesday भुसावळ : यावल तालुक्यातील अकलूद येथील शुभम सपकाळे या तरुणाच्या खून प्रकरणानंतर पोलिसांनी अद्याप दोन आरोपींना अटक केली नसल्याने कोळी महासंघाने आक्रमक पवित्रा घेतला असून शुभच्या दहाव्याच्या दिवसांपर्यत अर्थात 28 मार्चपर्यंत ही कारवाई न झाल्यास मंगळवारी पुन्हा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल तसेच अकलूद ते फैजपूर पोलिस ठाण्यापर्यत जिल्हाभरातील समस्त कोळी बांधव पायी चालत जावून आंदोलन छेडतील, असा इशारा कोळी महासंघातर्फे आयोजीत पत्रपरीषदेत मंगळवारी येथे देण्यात आला. तापी नगरातील सप्तश्रृंगी माता मंदिराच्या आवारात मंगळवारी कोळी महासंघातर्फे पत्रकार परीषदेचे आयोजन करण्यात आले.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
यावेळी कोळी महासंघाचे जितेंद्र सपकाळे, कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष हरलाल कोळी, रावेर तालुकाध्यक्ष बंडू कोळी, जिल्हा संघटक नारायण कोळी, देविदास कोळी, महेश सोनवणे, सागर कोळी, किरण तायडे आदींची उपस्थिती होती. माहिती देतांना कोळी समाज बांधवांनी सांगितले की, शुभम सपकाळे यांच्यावर संतोष गुप्ता, अविनाश गुप्ता, राज गुप्ता उर्फ भोला, चकर्‍या उर्फ गोविंद जैन, शामलाल गुप्ता यांनी 21 फेब्रुवारीला चाकूने वार केले. यात शुभम गंभीर जखमी झाला. त्याचा 19 मार्चला उपचार सुरू असतांनाच मृत्यू झाला. पोलिस प्रशासनाकडून संशयीतांच्या मुसक्या आवळण्याबाबत कोळी समाजाचा संशय निर्माण झाला आहे. संशयीत हे गुन्हेगारी पार्श्वभुमीचे आहे. ते दहशत निर्माण करतात. अकलूद परीसर व तापी नदीजवळील चहाचे स्टॉल हे गुन्हेगारांचा अड्डा झाल्याने शुभमला जीव गमवावा लागला मात्र पोलिसांकडून पाहिजे तशी कारवाई झाली नाही. हा तपास पोलिस निरीक्षक अथवा डीवायएसपी यांच्याकडे सोपवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

अश्या आहेत मागण्या
संतोष गुप्ता व शामलाल गुप्ता यांना तत्काळ अटक करावी, खूनाचा गुन्हा दाखल करावा, संशयीतांना गावात प्रवेश बंदी करावी, संबंधितांच्या घराचा शासनाने ताबा घ्यावा, अकूलद येथील टोल नाक्यावर असलेल्या चहाचे दुकान अतिक्रमीत जागेवर आहे, ते बंद करावे, हा खटला अतिजलद न्यायालयात चालवावा, सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती करावी, तसेच गावात अतिक्रमीत जागेत असलेले अतिक्रमीत बांधकाम पाडण्यात यावे, अशा मागण्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

अतिक्रमण काढणार
साोमवारी अकलूद ग्राम पंचायतीची तातडीची ग्राम सभा घेण्यात आली असून त्यात गावातील अतिक्रमण काढले जाणार असल्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आल्याची माहिती पत्रकार परीषदेत देण्यात आली.

जिल्हाभर आंदोलन छेडणार
शुभमच्या मारेकर्‍याना अटक करण्यात आली नाही तर कोळी महासंघातर्फे संपूर्ण जिल्हाभर मंगळवार, 28 रोजी आंदोलन छेडले जाणार आहे. रस्ता राको करणे, पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करणे, पोलिस अधिकारी यांना निवेदन देणे आदी उपक्रम राबविण्यात येणार आहे. असे त्यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !