‘चल बाबू बाय : उद्या माझे पोस्टमार्टम तुलाच करायचे आहे मात्र डोकं जास्त फाडू नको
Ambulance driver suicide in Chopra चोपडा : ‘चल बाबू बाय !’ असे व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवत खासगी रुग्णवाहिकेवरील चालकाने आत्महत्या केली. धक्कादायक म्हणजे शवविच्छेदन करणार्याला मित्राला त्याने मंगळवारी दुपारी भेटून उद्या माझे पोस्टमार्टम तुलाच करायचे आहे; पण जरा सांभाळून कर, डोकं जास्त फाडू नको असेही सांगितल्याची माहिती समोर आली आहे. गिरीश झुलाल पाटील (27, रंगराव आबा नगर, चोपडा) असे आत्महत्या करणार्या तरुणाचे नाव आहे.
तरुणाच्या आत्महत्येने हळहळ
गिरीश हा गेल्या अनेक वर्षांपासून खाजगी रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करीत होता. त्याचा चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात सर्वांशी चांगली ओळख होती तसेच शवविच्छेदन करणारा मामू ऊर्फ प्रशांत पाटील (40) यांच्याशीही चांगली मैत्री होती. गिरीशने मंगळवारी दुपारी मामूची भेट घेत ‘उद्या माझे पोस्टमार्टम तुलाच करायचे आहे; जरा सांभाळून कर. पण डोकं जास्त फाडू नको’ असेही सांगितले. यानंतर बुधवारी सकाळी गिरीश याने आत्महत्या केल्याचा निरोप आला आणि सर्वच जण सुन्न झाले. गिरीश हा परीवारातील एकुलता मुलगा होता. त्याने घरातील जिन्याच्या लोखंडी बीमला दोरी बांधून गळफास घेत जीवनयात्रा संपवली. गिरीश हा हा अनेक वर्षापासून रुग्णवाहिकेवर चालक म्हणून काम करीत करत होता. दरम्यान, गिरीशने प्रेमभंगातून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. गिरीश हा एकुलता एका मुलगा असल्याने कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला.
