निमखेडीच्या प्रौढाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यू
An adult from Nimkhedi died after being hit by a train जळगाव : गिरणा नदीजवळील रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेचा धक्का लागून निमखेडीच्या प्रौढाचा मृत्यू ओढवला. ही घटना गुरूवारी सकाळी सात वाजता. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. समाधान रमेश कोळी (42, निमखेडी, ता.जि.जळगाव) असे मयताचे नाव आहे.
रेल्वे रूळ ओलांडताना दुर्घटना
जळगाव तालुक्यातील निमखेडी गावात समाधान कोळी मजुरी काम करून पत्नीसह तीन मुलांचा उदरनिर्वाह करीत होते. गुरूवार, 23 मार्च रोजी सकाळी घरातून ते बाहेर पडल्यानंतर गिरणा नदीजवळील रेल्वे रूळ ओलांडत असतांना अचानक समोरून आलेल्या धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तालुका पोलिसांना माहिती दिल्यानंतर कर्मचारी घटनास्थळी आले व त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवला. या घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
