काय सांगता ! : चोरट्यांनी जळगावात चक्क वीज मीटरची केली चोरी
जळगाव : जळगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केटमधील व्यवसायिकाच्या दुकानाचे इलेक्ट्रिक मीटरच चोरट्यांनी लांबवल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी बुधवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.सुरेखा प्रमोद बर्हाटे (52, सूर्या अपार्टमेंट, पिंप्राळा) यांचे जळगाव शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केटमध्ये दुकान आहे.
चोरट्यांनी चक्क वीज मीटरच लांबवले
गेल्या सहा महिन्यांपासून दुकानावर ईलेक्ट्रीक बिल येत नाही म्हणून त्यांनी ईलेक्ट्रीक मीटर रूममध्ये जावून पाहणी केली असता त्यांना मीटर दिसून आले नाही शिवाय महावितरण कंपनीत जाऊन चौकशी केल्यानंतर आम्ही मीटर काढले नसल्याचे उत्तर मिळाल्याने व एक हजार रुपये किंमतीच्या मीटरची चोरी झाल्याची खात्री झाल्याने सुरेखा बर्हाटे यांनी बुधवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्याने चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.
