आता बोला ! बारावी पास सरकारी अधिकार्याने पाच कोटींचा केला गैरव्यवहार : अवैध मार्गातील पैशांची बारबालांवर उधळपट्टी
नवी दिल्ली : शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार नवीन नाही मात्र एक करोडपती अधिाकारी त्याच्या कारनाम्यांमुळे चर्चेत आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी अधिकार्याने 28 खात्यांमध्ये शासकीय पैसा वळवत बारबालांवर उधळपट्टी केली शिवाय कोट्यवधींची माया जमवली आहे. इंदूरमधील जिल्हाधिकारी कार्यालयाती हा बारावी पास अधिकारी कार्यरत असल्याचे समोर आले आहे.
निलंबनानंतर अनेक गैरप्रकार उघड
हल्लीच इंदूर कलेक्ट्रेट कार्यालयामध्ये असलेला सरकारी अधिकारी मिलाप चौहान याच्यावर घोटाळ्याचा आरोप लागला होता. प्राथमिक तपासात त्याने केलेला घोटाळा हा एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचा असल्याचे समोर आले होते. कलेक्टरांनी त्याला निलंबित करून तपासासाठी एडीएम राजेश राठोड याच्या नेतृत्वाखाली टीम स्थापन केली होती. त्यामध्ये या सरकारी अधिकार्याच्या भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांचा उलगडा झाला. तसेच त्याने पाच कोटी रुपयांहून अधिक रक्कम हडप केल्याचे समोर आले. हा पैसा त्याने 28 बँक खात्यांमध्ये वळवलाा. त्यातील अनेकजण त्याचे नातेवाईक होते. दरम्यान, घोटाळ्याचा हा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.




पाच कोटीहून अधिक रक्कम वळवली
जिल्हाधिकारी कार्यालयातील मिलाप चौहान हा अधिकारी केवळ 12वी पास आहे. त्याने सरकारी लेखा परीक्षकांच्या दुर्लक्षाचा पुरेपूर फायदा उचलला. त्याने वेगवेगळ्या 28 खात्यांमध्ये 5 कोटींहून अधिक रक्कम वळवल्याचेही समोर आले. दरम्यान, चौकशीमध्ये त्याने या पैशांमधून केलेल्या उधळपट्टीबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. त्याने दिलेली माहिती ऐकून तपास अधिकार्यांनाही धक्का बसला आहे. अनौपचारिक चर्चेदरम्यान, त्याने अधिकार्यांना सांगितले की, त्याने अनेकदा विमान प्रवास केला आहे. या कमाईतील बरीचशी रक्कम त्याने कॉलगर्ल्स आणि गर्लफ्रेंड्सवरही खर्च केली. तसेच नातेवाईक आणि परिचितांच्या नावावर जमिनीचे सौदेही केले.
रक्कम वसुलीबाबत प्रश्नचिन्ह
एवढा घोटाळा समोर आल्यानंतरही अधिकार्यांनी पोलिसांकडे तक्रार का केली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच पोलिसांनीही कुठलाही गुन्हा दाखल केलेला नाही. आता ही रक्कम या अधिकार्याकडून कशी वसूल केली जाईल याबाबत प्रश्न निर्माण झालेला आहे.