भरधाव कंटेनरने दुचाकीला उडवल्याने धरणगावातील वकीलांचा मृत्यू : जळगावातील घटना
Dharangaon lawyer dies after speeding container overturns two-wheeler : incident in Jalgaon जळगाव : मालवाहू कंटेनर वाहनाने धडक देवून चिरडल्याने धरणगावातील वकीलांचा शहरात दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी रात्री साडेआठ वाजता मानराजपार्क घडला. अॅड.विवेक पाटील (35) असे मय वकीलांचे नाव आहे.
अपघातानंतर कंटेनर चालक पसार
गुरुवारी सायंकाळी अॅड.विवेक पाटील हे जळगावहून आपले कामकाज करून धरणगावकडे दुचाकी (एम.एच.19 सी.एच.1396) ने निघाले असताना मानराजपार्क जवळ समोरून येणार्या कंटेनर (एम.एच.04 एच.एच.2094) ने धडक दिल्याने अॅड.विवेक पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर नगरसेवक अमर जैन आणि सागर पाटील यांनी घटनास्थळ गाठत जिल्हा रुग्णालयातून शववाहिका मागवत वाहतूक सुरळीत करण्यास मदत केली.

अपघातानंतर कंटेनर चालक पसार
वकील क्षेत्रात कार्यरत असलेले अॅड.विवेक पाटील हे नित्यनियमाने धरणगाव येथून अप-डाऊन करीत होते मात्र गुरुवारी उशिर झाल्याने रात्री ते घराकडे निघाल्यानंतर क्रुर काळाने त्यांच्यावर घाला घातला. मयत अॅड.पाटील यांच्या पश्चात सहा महिन्यांची मुलगी, पत्नी आणि आई असा परीवार आहे. अपघातामुळे दोन्ही बाजुची वाहतूक पुर्णतःठप्प होवुन जवळपास दोन्ही बाजुने 3-4 किलोमिटर लांबचलाब वाहनांच्या रांगा लागल्या.