तरसोदला घरफोडी : 26 हजारांचा ऐवज लंपास


Burglary in Tarsod : 26 thousand in lieu of compensation जळगाव : जळगाव तालुक्यातील तरसोद येथे बंद घरात चोरट्यांनी चोरी करीत रोकडसह सोन्याचे दागिणे मिळून 26 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
तरसोद गावात बौद्धवाडा परीसरात ताईबाई अशोक सोनवणे (65) या वयोवृद्धा वास्तव्यास आहेत. बुधवार, 22 मार्च रोजी रात्री दहा ते 23 मार्च रोजी सकाळी 9 वाजे दरम्यान ताईबाई बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून 20 हजारांची रोकड तसेच सहा हजारांच्या दोन ग्रॅमच्या सोन्याच्या बाह्या असा एकूण 26 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या ्रकरणी गुरुवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !