जळगावात विवाहितेचा विनयभंग : जाब विचारणार्या पतीलाही मारहाण
molestation of a married woman in Jalgaon : Even the husband who asked for an answer was beaten up जळगाव : शहरातील एका विवाहितेचा विनयभंग करण्यात आला तर या प्रकरणी जाब विचारणार्या पतीलाही मारहाण करण्यात अली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.
तिघांविरोधात गुन्हा दाखल
शनिपेठ परीसरातील एका भागात 35 वर्षीय विवाहिता ही पतीसह कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे. विवाहिता ही 22 रोजी रात्री 12.45 वाजता घराजवळ असलेल्या मारोती मंदिराजवळ सार्वजनिक जागी उभी असताना संशयित पंकज अंबादास सोनवणे हा त्याठिकाणी आला व त्याने विवाहितेसोबत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. याबाबत विवाहितेचे पतीने जाब विचारला असता त्यांनाही पंकज याने तुटलेल्या बॅटने मारहाण केली तर सुभाष अंबादास सोनवणे व राधाबाई अंबादास सोनवणे या दोघांनी विवाहितेस शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरुन पंकज सोनवणे, सुभाष सोनवणे व राधाबाई सोनवणे या तिघांविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल परीष जाधव हे करीत आहेत.
