जळगावात दुकानदाराला मारहाण करीत लुटले : त्रिकूटाविरोधात गुन्हा
Shopkeeper beaten and robbed in Jalgaon : Crime against the trio जळगाव : संगणक दुरुस्तीचे काम करणार्या दुकानदारास रीक्षातून आलेल्या तिघांनी मारहाण करीत लुटल्याची घटना शहरात घडली. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
त्रिकूटाचा पोलिसांकडून कसून शोध
मारहाणीत केजाद नवरोज जलगाववाला हे गोलाणी मार्केटमधील दुकानदार जखमी झाले. गुरुवार, 23 मार्च रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास केजाद जलगाववाला हे आपल्या दुकानात संगणकाचे सामान ठेवण्यासाठी गेले असता रीक्षाने आलेल्या तिघांपैकी एकाने त्यांना पैसे मागितले. आपल्याकडे केवळ दहा रुपये असल्याचे त्याने तिघांना सांगितलल्यानंतर पुढच्याच क्षणी एकाने त्याच्या खिशात हात घालून पैसे काढण्याचा प्रयत्न केला. केजाद याच्या खिशात पैसे नसल्यामुळे तिघांनी त्याच्या खिशातील मोबाईल हिसकावून घेतला. याशिवाय दुस-याने त्याची मान धरुन ठेवत बॅग हिसकावून घेतली आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्याचा डोळा सुजला. 53 हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावणार्या तिघांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
