काय सांगता : भडगावातून नायब तहसीलदारांची दुचाकीची चोरी


भडगाव : तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदारांची राहत्या घरासमोरून चोरटयांनी त्यांची होंडा शाईन कंपनीची दुचाकी लांबवली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

दुचाकी चोरीने खळबळ
भडगाव शहरातील महसूल कॉलनी (शिवाजी नगर) येथे वास्तव्यास असलेले भडगाव तहसीलचे नायब तहसीलदार राजेंद्र अहिरे यांच्या मालकिची होन्डा शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटार सायकल (क्र.एम.एच १९ डि.जे १७७५) ही गुरूवार, २३ मार्च २०२३ रोजी रात्री ११.४५ वाजता त्यांच्या भडगाव महसुल कॉलनीजवळील घरासमोरील गेटसमोरून चोरट्यांनी लांबवली. शुक्रवार, २४ मार्च रोजी रोजी सकाळी ५ वाजता दुचाकी चोरी झाल्याचे उघडकीस आले. याबाबत दुचाकीचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने नायब तहसीलदार राजेंद्र अहिरे यांनी भडगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास तात्याबा नागरे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !