धक्कादायक : वयोवृद्ध शेतकऱ्याला मारहाण करीत हातातील अंगठी भामट्यांनी लांबवली


जामनेर : शहरातील श्रीराम मार्केटजवळील एका दुकानावर वयोवृध्दाला काठीने मारहाण करून २७ हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी चोरून लांबवण्यात आली. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा
रामसिंग जवारसिंग राठोड (७५, रा.डोहरीतांडा, ता.जामनेर) जि.जळगाव हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. रामसिंग राठोड हे जामनेर येथील आठवडे बाजारात गुरूवार, २३ मार्च रोजी आले होते. शहरातील श्रीराम मार्केटजवळील एका दुकानावर खरेदी करत असतांना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हातातील काठी हिसकावून मारहाण केली व रामसिंग राठोड यांच्या हातातील सोन्याची अंगठी जबरी हिसकावून चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर शनिवार, २५ मार्च रोजी जामनेर पोलीस ठाण्यात धााव घेवून तक्रार दिल्याने दुपारी अज्ञात चोरट्यांविरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार जयेंद्र पगारे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !