जळगावात घरफोडीपूर्वी तिघे संशयित एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात
Three suspects in MIDC police net before burglary in Jalgaon जळगाव : घरफोडी व चोरीच्या उद्देशाने दुचाकीवरून फिरणार्या तीन संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी शहरातील सिंधी कॉलनीजवळील कुंवरनगरात अटक केली. या प्रकरणी शनिवार, 25 मार्च रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हालचाली संशयास्पद वाटल्याने कारवाई
शहरातील सिंधी कॉलनीजवळील कुंवरनगरात शनिवार, 25 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता नाकाबांदी करून वाहनांची चौकशी करत असतांना तीन जण दुचाकीने चोरी व घरफोडी करण्याच्या उद्देशाने संशयास्पद हालचाली करत असल्याचे एमआयडीसी पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, अशोक पवार, सुधीर साळवे, श्रीकांत बदर, होमगार्ड रवींद्र पाटील यांनी पाठलाग करीत रवी प्रकाश चव्हाण (19, तांबापुरा, जळगाव) आणि साईनगरातील दोन अल्पवयीनांचा समावेश आहे. संशयीतांकडील दुचाकी हस्तगत करण्यात आली. शनिवारी रात्री उशीरा पोलीस नाईक श्रीकांत बदर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
