कजगाव शिवारातील महिलेचा विनयभंग : एकाविरोधात गुन्हा
molestation of woman in Kajgaon Shivar : Crime against one भडगाव : भडगाव तालुक्यातील कजगाव शिवारातील एका शेतात 45 वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. या प्रकरणी संशयित प्रकाश पंढरीनाथ पवार (कजगाव, ता.भडगाव) विरोधात भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतशिवारात केला विनयभंग
भडगाव तालुक्यातील एका गावातील 45 वर्षीय पीडीत महिलेच्या तक्रारीनुसार, त्यात बकरी चारून आपला उदरनिर्वाह करतात. शनिवार, 25 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास महिला शेतातून चारा आणत असतांना संशयित प्रकाश पंढरीनाथ पवार याने महिलेचा रस्ता अडवत महिलेची साडी ओढली व तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने तातडीने रात्री 10 वाजता भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार छबुलाल नागरे करीत आहे.
