जळगाव खुनाने हादरले ; संशयित ताब्यात

मध्यवस्तीतील गोलाणी मार्केट येथील घटना


जळगाव : शहरातील गजबजलेल्या गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर गांजा पित असलेल्या तरुणांमध्ये वाद झाल्यानंतर एका तरुणाचा चॉपरने वार करून निर्घृण खून करण्यात आला. ही घटना रविवार, २६ मार्च रोजी रात्री १० वाजेनंतर घडली. खून प्रकरणी पोलिसांनी ६ आरोपी निष्पन्न केले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सोपान बबन हटकर (३५, रा. हरी विठ्ठल नगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

जळगाव शहरात गुन्हेगारी बोकाळली
गोलाणी मार्केट येथे रात्री ९ वाजेच्या सुमारास ज्ञानेश्वर लोंढे (रा. कंजरवाडा) , रोहित भट (रा.खोटे नगर) यांच्यासह पिंटू परदेशी व इतर तीन हे तळमजल्यावर गांजा पीत बसले असताना सोपान हटकर आला. त्या ठिकाणी त्यांच्यात काहीतरी वाद झाला. नंतर मारामारी झाली.
रोहित भट यांच्याकडे चॉपर आहे, हे ज्ञानेश्वरला माहीत होते. हाणामारी होत असताना ज्ञानेश्वर लोंढे याने रोहित याच्याकडील हिसकावून घेत सोपान हटकर याच्यावर वार केले. वादाचे पर्यवसान सोपान हटकर याचा चॉपरने वार करून निर्घृण खून करण्यात आले आहे.

पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी चोपरचे कव्हर पोलिसांना मिळाले आहे. मयत तरुणाचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव या ठिकाणी हलविण्यात आला. पोलिसांनी रात्रीच संशयितांची नावे निष्पन्न करून त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना आता शहर पोलीस स्थानकात जमा करण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नजन पाटील,पोलिस उपनिरीक्षक देवळे, शेवंगे, चौबे,पोलिस हे. काॅ. संजय हिवरकर,विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे ,राजेश मेंढे, ,अक्रम शेख, विजय पाटील, आश्रफ शेख, कमलाकर बागुल, संतोष मायकल, महेश महाजन यांनी आरोपींना पकडले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !