भालोद गावात वीज चोरी : महिलेविरुद्ध गुन्हा दाखल


यावल : तालुक्यातील भालोद या गावात वीज चोरीविरुद्ध मोहिम राबवण्यात आली. यात एका ठिकाणी चोरी होत असल्याचे उघड झाल्याने संबधीत महिलेस दंडाची नोटीस बजावण्यात आली मात्र, त्यांनी दंड अदा न केल्याने त्यांच्याविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वीज चोरीचा गुन्हा
भालोद, ता.यावल या गावात फैजपूर वीज वितरण कक्षाचे कनिष्ठ अभियंता दीपक ब्रिजलाल पाटील यांनी वीज चोरीविरुद्ध तपासणी मोहिम राबवली. अभियंता पाटीलसह केतन पाटील, सचिन चौधरी, नयना इंगळे संजय नेहेते, किशोर जावळे या पथकाने गावात शोध मोहीम घेतली यामध्ये त्यांना बेबाबाई भागवत कोळी या वीज चोरी करतांना आढळून आल्याने त्यांना २ हजार ३४२ रुपये दंड आकारण्यात आला होता मात्र त्यांना दंड अदा करण्याच्या सुचना देण्यात आल्या मात्र त्यांनी दंड अदा न केल्याने त्यांच्याविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !