प्लॅस्टीक कचर्‍याआड गुटख्याची तस्करी : धुळे गुन्हे शाखेकडून लाखाचा गुटखा जप्त

दहिवेलनजीक ट्रकसह 12 लाखांचा मुद्देमाल जप्त : ट्रक चालकाला अटक


Smuggling of Gutkha under Plastic Garbage :  Dhule Crime Branch seizes Gutkha worth Rs. धुळे : धुळे स्थानिक गुन्हे शाखेने प्लॅस्टीक कचर्‍याआड होणार्‍या गुटख्याची वाहतूक रोखत एक लाखांचा गुटखा जप्त केला आहे तसेच दहा लाखांच्या ट्रकसह एकूण 12 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साक्री तालुक्यातील दहिवेलजवळ रविवारी करण्यात आली. या प्रकरणी ट्रक चालक शेख अस्लम शेख उस्मान (43, आझादनगर, गल्ली नंबर पाच, मालेगाव) यास अटक करण्यात आली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
प्लॉस्टीक कचरा आणि कपड्यांच्या गठ्ठयाआड गुटख्याची चोरटी तस्करी होत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात सापळा रचण्यात आला. सुरत येथून निघालेल्या ट्रक (एम.एच.41 जी.7165) हा साक्री-धुळे मार्गे मालेगाव येथे येत असतानाच दहिवेलनजीक त्यास ताब्यात घेण्यात आले. ट्रकची झडती घेतल्यानंतर त्यात प्लॅस्टीक कचरा व कपड्ड्यांच्या गठ्ठ्याआठ 98 हजार 400 रुपयांचा सुगंगी पानमसाला आढळला तर दहा लाखांचा ट्रक, पाच हजारांचा मोबाईल, सव्वा लाखांचे कापडाचे गठ्ठे असा एकूण 12 लाख 18 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी महेंद्र सपकाळ यांच्या फिर्यादीवरुन साकी पोलिसात ट्रक चालकासह सुफियान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, संतोष हिरे, सतीष पवार, पंकज खैरमोडे, महेंद्र सपकाळ यांच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !