धुळ्यात धाडसी घरफोडी : मालेगावातील कुविख्यात आरोपी जाळ्यात


Daring burglary in Dhule : Notorious accused in Malegaon in the net धुळे : शहरातील नटराज टॉकीज परीसरात घडलेल्या धाडसी चोरीची उकल करण्यात आझादनगर पोलिसांनी यश आले आहे. या प्रकरणी मालेगावातील सराईत गुन्हेगार इम्रान रफीक शेख (रा.अकरा हजार खोली, मालेगाव) यास अटक करण्यात आली.

दुचाकीसह मुद्देमाल जप्त
धुळे शहरातील नित्यानंद नगरातील आश्विनी सुहास लळीत यांच्या मालकीचे घर चोरट्याने गुरुवार, 16 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास फोडले होते. चोरट्याने घरातून 25 हजारांचा एलईडी टीव्ही, 24 हजार किंमतीचे पितळी व तांब्याच्या देवी-देवतांच्या मूर्ती, चांदीच्या पादुका लांबविल्या होत्या. यार घरफोडीत 27 हजार 400 रुपयांचा ऐवज लंपास झाला. या प्रकरण आझाद नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. सीसीटीव्हीच्या आधारे चोरटा निष्पन्न झाल्यानंतर आझादनगर पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला मालेगावातून ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्यातील संपूर्ण ऐवज काढून दिला असून गुन्ह्याकामी वापरेली दुचाकी (एम.एच.15 डी.डी. 1790) जप्त करण्यात आली. पोलिसांच्या कारवाईत एक लाख सात हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपीविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहा.पोलिस अधीक्षक ऋषिकेष रेड्डी, एलसीबी चे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या पथकातील हवालदार आरीफ सैय्यद, प्रकाश माळी, योगेश शिरसाठ, संदीप कढरे, सिद्धांत मोरे, चंद्रकांत पाटील, राजू ढिसले, आतीक शेख, सुशील शेंडे, अजहर शेख, शोएब बेग आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !