रावेर शहरातील पाच वीज चोरट्यांविरोधात गुन्हा
रावेर : रावेर शहरात विद्युत वितरण कंम्पनी कडून शहरात विज चोरी विरूध्द मोहिम राबवली यात शहरातील रोकडा हनुमान नगर सावदा रोड परिसरात विज चोरी करतांना पाच जण आढळुन आले तेव्हा या सर्वांना दंडाची नोटीस देण्यात आली मात्र, त्यांनी दंड अदा न केल्याने त्यांच्या विरूध्द यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्याने खळबळ
रावेर शहरातील राज्य विद्युत वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता दिलीप नानकराम सुंदराणी यांनी वीज तंत्रज्ञ भिका चैत्राम साळुंखे, चेतन रवींद्र भारदे, वासुदेव चौधरी, कमलेश माळी या पथकासह रावेर शहरातील रोकडा हनुमान नगर, सावदा रोड परिसर येथे वीज चोरी संदर्भात मोहीम राबवली या मोहिमे मध्ये जगदीश अशोक खंगर यांनी विज ग्राहक सुधाकर सोनू तायडे यांच्या मीटरमध्ये फेरफार केलेली आढळून आली त्यांना 10 हजार 336 रुपयाचा दंड आकारण्यात आला, जीवन लक्ष्मण बाविस्कर यांनी वीज चोरी केली म्हणून 7 हजार 795 रूपये दंड आकारण्यात आला,गोपाल रघुनाथ महाजन यांनी मिटर धारक रुक्मिणी रघुनाथ महाजन यांच्या मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केली म्हणून 27 हजार 132 रूपये दंड आकारण्यात आला. अनिल तुलसीराम अट्रावलकर हे वीज तारेवरून वीज चोरी करतांना आढळले त्यांना 9 हजार 069 रुपये दंड आकारण्यात आला आणी मनोज देविदास महाजन हे देखील वीज चोरी करतांना आढळून आले त्यांना 20 हजार 367 रुपये दंड आकारत या सर्वांना दंड भरण्याच्या नोटीस बजावल्या मात्र, या सर्वांनी दंड अदा न केल्याने त्यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात सहाय्यक अभियंता दिलीप सुंदराणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

रावेर शहरातील पाच वीज चोरट्यांविरोधात गुन्हा
पुन्हा वीज चोरी ः या शहरातील पाच जणांविरोधात दाखल झाला गुन्हा
ावल : रावेर शहरात विद्युत वितरण कंम्पनी कडून शहरात विज चोरी विरूध्द मोहिम राबवली यात शहरातील रोकडा हनुमान नगर सावदा रोड परिसरात विज चोरी करतांना पाच जण आढळुन आले तेव्हा या सर्वांना दंडाची नोटीस देण्यात आली मात्र, त्यांनी दंड अदा न केल्याने त्यांच्या विरूध्द यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.