सांगवी खुर्दूला जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाला चौघांकडून मारहाण


यावल : तालुक्यातील सांगवी खुर्द या गावात मागील भांडणाच्या कारणावरून एका 50 वर्षीय इसमाला चार जणांनी जबर मारहाण केली व त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली तेव्हा याप्रकरणी चार जणाविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

चौघांविरोधात गुन्हा दाखल
सांगवी खुर्दख ता.यावल येथील सुनील रामदास कोळी (50) या इसमाने यावल पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या घराच्या समोर तो उभा असतांना तेथे प्रभाकर सुका धनगर, सरलाबाई प्रभाकर धनगर, गोकुळ प्रभाकर धनगर व सतीश प्रभाकर धनगर सर्व रा.सांगवी खुर्द हे आले व मागील भांडणाच्या कारणावरून वाद घातला आणी तु केलेली केस मागे घे असे सांगून त्यांना शिवीगाळ केली व जीवे ठार मारण्याची धमकी देत फिर्यादीसह त्याच्या पत्नीला मारहाण केली यात कुर्‍हाडच्या उलट्या दांड्याने सुनिल कोळी यांच्या उजव्या दंडावर, पाठीवर, डोक्यावर दुखापत केली जखमी अवस्थेत सुनील कोळी यांना यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले नंतर जळगाव हलविण्यात आले. या प्रकरणी सुनील कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !